मा. मुख्याध्यापकांचा संदेश

मा. मुख्याध्यापकांचा संदेश

शिक्षणाचा व्यापक विचार करताना ज्याने व्यक्तिमत्व विकसन होते तसेच मनुष्यात अंतभूर्त असलेल्या सुप्त क्षमतांचा विकास ज्यातून होतो ते म्हणजे शिक्षण होय. सर्व मानवी शक्तींचा व गुणांचा विचार ज्यामध्ये होतो अशी व्यक्तिमत्वाची संकल्पना शोधली गेली तर पंचकोश संकल्पनेच्या रूपाने ते सापडते.

“मनोमय: प्राणशरीरनेता प्रतिष्ठितो अन्ने हृदयं संनिधाय । तद विज्ञानेन परिपश्यन्ती धीरा: आनंदरूपम अमृतं यद् विभति ॥”

अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशांच्या विकासानेच व्यक्तिमत्वचा पूर्ण विकास शक्य होत असतो. अशा पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणारी व राष्ट्रहितासाठी मनुष्य निर्मिती करणारी निरंतर शिक्षण प्रक्रिया १ सप्टेंबर १९८४ पासून जेथे सुरू आहे ते ठिकाण म्हणजे ओझर टाउनशिप परिसरातील आपली गो.ए.सो.चे एच.ए.एल. हायस्कूल मराठी माध्यम होय.

शाळेच्या स्थापनेपासून आजतागायत शाळेच्या प्रगतीचा व कर्तुत्वाचा आलेख हा सतत उंचावत जाणारा आहे. शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास करून शाळेचा रिझल्ट वाढविणे असे मर्यादित उद्धिष्ट न ठेवता शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांची सर्वांगीण जडणघडण हे अंतिम उद्धिष्ट लक्षात ठेवत ती जबाबदारी समर्थपणे झेलण्याचा प्रयत्न शाळा सतत करत आली आहे.

एच.ए.एल. व्यवस्थापनाकडून प्राप्त शालेय इमारत, प्रशस्त व सुंदर आहे. शाळेसाठी आवश्यक वीज,पाणी, स्वच्छता व सुरक्षितेसाठीच्या सुविधाही एच.ए.एल. कडून प्राप्त होत असतात. विद्यार्थ्यामधील आरोग्य सवयी व खेळाची आवड जोपासण्यासाठी खूप मोठे क्रीड़ांगण शाळेकड़े आहे. त्याचाच परिणाम म्हणून शालेय विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धापर्यंत आपल्या खेळाची चमक दाखवून शाळेचे व संस्थेचे नाव उंचावत आहेत.

विधार्थ्यांना मार्गदर्शन करणारे व अध्ययनास सहकार्य करणारे शाळेतील शिक्षक हे अनुभवी व आपआपल्या विषयात अदयावत आहेत. अध्यापनासाठी नवनवीन पद्धती व तंत्रे यांचा वापर केला जातो. ज्ञानरचनावादी अध्यापना बरोबरच संगणकीय शिक्षणावरही भर दिला जातो. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासासाठी अधिकाधिक कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर करुन याचा प्रयत्न शाळेत सुरू असतो.

शाळा ही मूल्यसंस्कारांचे मुख्य केंद्र आहे. राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपाणा, सौजन्यशीलता, समानता, नीटनेटकेपणा, एकात्मता इ. मूल्यांवर लक्ष केंद्रीत करुण शालेय अभ्यासक्रमा सोबत विविध सहशालेय उपक्रम शाळेत आयोजित करुन विधार्थ्यांना विकसीत करण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. दैनंदिनी परिपाठातील प्रार्थना पाठांतर याबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी शपथविधी, स्काउट-गाईड शिबीर, सहल, परिसर स्वच्छते साठीचे उपक्रम वृक्षारोपण व संगोपन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादि मधून विधार्थ्यांना संस्कारी बनविण्याचा प्रयत्न सुरू असतो. शाळेचे अजून एक वेगळेपण म्हणजे शाळेतील विधार्थ्यांसाठी राबविली जाणारी ‘गृहपद्धती’ होय। लाल-पीत-नील अशा तीन गृहात विध्यार्थी व त्याचे मार्गदर्शक शिक्षक विभागले जातात. वर्षभरात  या तीन गृह अंतर्गत अनेक प्रकारच्या  स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात वकृत्व स्पर्धा, निबंध, नृत्य, गायन व नाट्य स्पर्धेसोबतच विविध क्रीडा स्पर्धाचा क्रीडा मोहोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहत आयोजित केला जातो. विध्यार्थ्यांच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेत शाळेतील ही गृहपद्धती नक्कीच खूप मोठा हातभार लावते.

शाळेतून ज्ञानाची व संस्काराची शिदोरी घेऊन बाहेर गेलेले शाळेचे माजी विद्यार्थी आज समाजातील सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करुन नावलौकिक मिळवित आहेत. त्यांचा नावलौकीका सोबत शाळेचे नावही गौरवान्वित होत आहे. माजी विधार्थ्यांनी शाळेशी असलेला ऋणानुबंध आजही जोपासला आहे. त्यातूनच माजी विद्यार्थी मेळावा शाळेत आयोजीत झाला. शाळेला शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात. नक्कीच हे आनंददायी व प्रेरणादायी आहे.

आपली शाळा ISO 9001:2015 प्रमाणित असून ISO मानांकनाचा दर्जा शाळेने सतत राखला आहे. त्यासाठी शाळेतील सोयी-सुविधा, वर्ग खोल्या, संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाला, कार्यालय, क्रीडांगण इ. सर्व नियमित सुस्थितीत व अदयावत ठेवले जाते.

बदलत्या सामाजिक व संस्कृतिक, शैक्षणिक वातावरणमुळे अनेक नवीन पद्धतीच्या समस्या व प्रश्न भविष्यात उभे राहण्याची शक्यता असली तरी येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण योग्य पद्धतीने करुन शाळेतील विद्यार्थ्यांची घडणीची प्रक्रिया निरंतर चालू राहील व त्यासाठीचे प्रयत्न अखंड सुरू राहतील हा विश्वास आहे.

एक प्रतिज्ञा असे आमूची ज्ञानाची साधना । चिरंतन ज्ञानची साधना ।
ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना ।।।

 

श्रीमती. एस.पी. गाजरे
मुख्याध्यापिका