शाळेबद्दल माहिती

शाळेचा इतिहास

आपल्या कर्माचा-यांच्या मुलांना उत्तम शिक्षण विषयक सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून एच.ए.एल. ने १९६८ साली एका लहान स्वरूपात ही शाळा स्थापना केली. कारखान्याचा व्याप वाढत असताना शाळेत मुलांची संख्या त्याच प्रमाणे वाढू लागली. म्हणुन शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेल्या एका संस्थेकड़े शिक्षणाचा दर्जा उत्तम राहावा ह्या हेतूने ही शाळा सुपूर्त करण्याचे ठरविले, आणि म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीला पाचारण करुण दि.८ जून १९७० पासून ह्या शाळेचे व्यवस्था व शिक्षणाचे ज्ञानदान देण्याचे कार्य शाळेकडे सोपविण्यात आले. आज ही शाळा गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.ए.एल. हायस्कूल ह्या नावाने परिचित आहे. विद्यार्थी संख्या ४००० पर्यंत गेल्याने व्यवस्थापनाच्या दृष्टीने इंग्रजी व मराठी शाळा स्वतंत्र होणे ही काळाची गरज होती. त्यास शासनाने मंजूरी देऊन मराठी माध्यमाची स्वतंत्र शाळा चालविण्यासाठी परवानगी संस्थेस दिली. १ सप्टेंबर  १९८४ पासून मराठी माध्यमाची शाळा स्वतंत्र झाली.

         गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, अधिक्षक आणि सर्व माजी मुख्याध्यापक यांनी व्यक्तिगत लक्ष घातले. त्याबद्दल मी सध्याची मुख्याध्यापिका श्रीमती गाजरे एस.पी. मन:पूर्वक आभारी आहे. भविष्यातही सर्वांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करते.

शाळेची स्थापना : – १ सप्टेंबर १९८४