गुणवत्ता विषयक धोरण
आम्ही गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल (मराठी माध्यम) येथे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरील संपूर्ण उन्नतीच्या कार्यासाठी विशेषत: माध्यमिक शिक्षणाद्वारा सुयोग्य अभ्यासक्रम व सहशैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमाद्वारे जागतिक दर्जाचे नागरिक निर्माण करण्यास कटीबद्ध आहोत. हे विद्यालय उच्च नीतिमत्ता, सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी आणि विश्वबंधुता आदि गुण वर्धिष्णू करण्यास कृतनिश्चय आहे.
या विद्यालयात विद्यार्थ्यांनी जीवनभर चालणा-या संपूर्ण गुणवत्ता प्रधान शिक्षण प्रक्रियामध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करावी व त्यांची सामाजिक, आर्थिक स्तरांवर सर्वकष उन्नति साधावी या उद्धेशाने, विद्यार्थी, शिक्षक, सहकारी कर्मचारी व पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून सतत कार्य सुरू असते.